मुक्ता मोटे या गणपत्तीपुळे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

                     गेवराई दि 9 ( वार्ताहार ) 
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेतील सहशिक्षिका मुक्ताबाई मोटे यांना रविवार दि.९ रोजी गणपत्तीपुळे या ठिकाणी अविष्कार फाऊंडेशन इंडिया चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे (कोल्हापुर ) हे होते. तर प्रमुख म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक सुनील नाडकर (पाटील) (डोंबिवली), प्राचार्य थोरात (पुणे) व अविष्कार फाऊंडेशन इंडिया चे अध्यक्ष संजयजी पवार हे होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेतील सहशिक्षिका मुक्ताबाई नारायण मोटे यांना रविवार दि.९ रोजी गणपत्तीपुळे या ठिकाणी अविष्कार फाऊंडेशन इंडिया चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मुक्ता मोटे यांना मिळालेल्या पुरस्कारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना शाळेचे संस्थाचालक गोपिनाथ घुले, अध्यक्ष रामदास गिते, मुख्याध्यापक बापुराव घुले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पत्रकार, नातलग व मित्र मैत्रिणी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *