गोवा इंटरनँशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेवराईच्या शेख असलम यांना उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
गेवराई दि.9 ( वार्ताहार ) गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल 2021 मध्ये ” तासिका ” या शॉर्ट फिल्म साठी शेख असलम युनूस बागवान यांना पदार्पणातील उत्कृष्ठ दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सातशे पेक्षा अधिक चित्रपटांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता हे विशेष. आभासी पद्धतीने झालेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शेख असलम बागवान यांच्या लघुचित्रपटाने आपली विशेष छाप पाडली आहे. तासिका या लघु चित्रपटामध्ये तासिका तत्त्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या कथा आणि व्यथा दाखवण्यात आलेल्या आहेत.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रश्न मांडणारा असलम शेख यांच्या “तासिका” या लघुचित्रपटामध्ये संस्थेच्या कॉलेजमधे तासिका तत्वावर काम करना-या प्राध्यापकांची कथा आहे. ज्यामधे कमी पगार असल्यामुळे प्राध्यापकांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येते. लग्न न होने, परमानेंट न होने, आर्थिक परिस्थितिमुळे सी.एच.बी. प्राध्यापकांचे वर्तमान आणि भविष्य अंधकारमय झाले आहे , त्यावर लेखक-दिग्दर्शक म्हणुन असलम शेख यांनी चित्रपट माध्यमातून उत्कृष्ट पणे भाष्य केले आहे. तासिका या वास्तववादी लघुपटात व्यवस्थेच्या विरोधात बंड करण्याची इच्छा असूनदेखील सुशिक्षित, सेट-नेट,पी.एच.डी झालेल्या प्राध्यापकांना बंड करता येत नाही ही व्यथा दाखवली आहे. सी.एच. बी. हे प्रतिष्ठेचे पद आहे की लाचारीचे? यावर दृश्य माध्यमातून प्रेक्षकांना गंभीर विचार करण्यास दिग्दर्शक प्रवृत्त करतो.
या लघुचित्रपटाची निर्मिती गेवराई, बीड येथील भूमिपुत्र असलेल्या बागबान प्रोडक्शनच्या सलमान शेख यांनी केली असून, असलम शेख यांनी कथा,पटकथा,संवाद व दिग्दर्शन केले. आहे,छायाचित्रण अनिल बडे यांचे असून,संकलन महेश हरबक, अनिल बडे,संगीत पंकज मोरे ,कलादिग्दर्शन रामेश्वर देवरे,पंकज लोखंडे,प्रोडक्शन मॅनजमेंट रावबा गजमल,अभिमान उनवणे, रंगभूषा जॉय भांबळ,गायत्री तरतरे सहाय्यक दिग्दर्शन बाळू बटुळे , राजेश आगूंडे यांचे असून,रुपेश परतवाघ,जगदीश जाधव,संदीप पाटील, गजेंद्र घायवट, पृथ्वी काळे,ऐश्वर्या कुलकर्णी,अनिलकुमार बस्ते,पद्मनाभ पाठक, प्रियांका गंगावणे, सुनील कांबळे, पृथ्वी खेंगटे, जयश्री शिरके, जगदीश कोथळे यांच्या सहित जवळपास 30 ते 40 कलाकारांनी या लघूपटात भूमिका साकारल्या आहेत.,शेख असलम बागवान यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...