कोरोना महामारित रूग्णांना अन्न पुरवठा करणाऱ्यांचे प्रशासनाने बील थकविले

प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा

                      गेवराई दि 8 ( वार्ताहार )

कोरोना बाधित रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रशासनाकडून उत्तम आहार देण्यासाठी विविध भोजन संस्थांना कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार संबंधितांनी २६ एप्रिल ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत रूग्णांना नियमीत अन्नपुरवठा केला,कोरोनाची लाट ओसरून अनेक महिने उलटली परंतु जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही त्यांची देयके देण्यात आले नाही. त्यामुळे, रुग्णांचे पोट भरणाऱ्यांवरच उपासमारीची वेळ आली असून प्रजासत्ताक दिनापूर्वी आमची देयके अदा करावी नसता प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा गेवराई येथील भोजन पुरवठादारांनी दिला आहे.

कोरोना महामारीत शासनाकडून बाधित रुणांना सर्व सोयी सुविधा पुरविण्याचे आदेश काढले. काढत सुविधा प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार संबंधित ठेकेदारांनी स्वादिष्ट जेवण रुग्णांना पुरवठा केला. परंतु कंत्राटदारांनी पुरविलेल्या भोजनाचे आजही जिल्हा प्रशासनाकडून निधी नसल्याचे सांगत त्यांची देयके अदा करण्यात आली नाही. संबंधित कंत्राटदारांना वेठीस धरण्याचे काम केले जात असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.प्रशासनाकडून उदासिनता दाखविली जात असल्याने आमच्यावर उपास मारीची वेळ आली आहे. त्यामुळे २६ जानेवारी पर्यंत आमची देयके अदा करावीत नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार असल्याचे गेवराई येथील सौरभ भोजनालय, अजयसूर्य भोजनालय, मातोश्री भोजनालय, व गढी येथील हॉटेल विठ्ठल साईच्या चालकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *