गेवराई दि 7 ( वार्तांहार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिना निमित्त गेवराई शहरातील इरा स्कूलमध्ये दर्पण दिनाचे औचित्य साधून पञकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर होते तर व्यासपीठावर इरा स्कूलचे अध्यक्ष गणेश क्षीरसागर, पत्रकार संघाचे सचिव दिनकर शिंदे, प्रा राजेंद्र बरकसे, आयुब बागवान, दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, कैलास हादघुले, भागवत जाधव, प्रा. सुनिल मुंडे, काझी अमान, विनोद पौळ, शिवाजी ढाकणे, अमोल वैद्य, प्रदिप जोशी, प्राचार्या अश्विनी कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सध्याची पञकारीता व चालू घडामोडी या विषयावर तयार केलेल्या भित्तीपञकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पञकार दिनकर शिंदे यांनी पञकारांच्या कार्याची माहिती सांगून ते पुढे म्हणाले विद्यार्थी जिवन खेळकर वृत्तीचे असते, या जिवनात गाणे, नाचणे व हसत – खेळत शिक्षण घेणारा विद्यार्थी यशस्वी होतो. लाॅकडाऊन मुळे शाळा बंद पडली. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू झाली. मुलांच्या हातात मोबाईल आला. बदलेल्या या नवीन शिक्षण पध्दतीचा त्यांनी स्विकार केला. माञ ख-या अर्थाने शिक्षण शाळेतच मिळते असे ते म्हणाले. यावेळी पञकार प्रा. राजेंद्र बरकसे, प्रा. सुनिल मुंडे यांनी पत्रकारांचे कार्य, समाज जिवनातील त्यांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश क्षीरसागर यांनी केले. सुञसंचलन दुर्गा बोर्डे यांनी केले. आभार योगेश गायकवाड यांनी मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.