अट्टल महाविद्यालयात करियर जागृकता कार्यक्रमांतर्गत पराग राणे यांचे व्याख्यान संपन्न
गेवराई, दि. 7 ( वार्तांहार )
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथे करियर जागृकता कार्यक्रमाअंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम हा वाणिज्य व व्यवस्थापन विषयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीएमए पराग राणे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल सखोल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील संधी व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी शिखरे या होत्या. वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संदीप वंजारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर आभार डॉ. भारत दहे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, डॉ.प्रशांत पांगरीकर, डॉ. राहुल माने, डॉ. एम. बी. शिंदे, डॉ. व्ही. डी. जाधव, राजेंद्र हजारे यांची उपस्थिती होती.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...