गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिन उत्साहात साजरा
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव ;अनाथालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
गेवराई : दि 6 ( वार्तांहार )
गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाच्या वतीने गुरुवार दि.६ रोजी दर्पनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. तसेच दक्ष पत्रकार संघाच्या वतीने येथील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यासह सहारा अनाथालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देत दक्ष पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या.
मराठी पत्रकारीतेची पायाभरणी करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि.६ जानेवारी रोजी सर्वत्र दर्पणदिन उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक उपक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारासह गौरविण्यात येते. मात्र यावर्षी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दक्ष पत्रकार संघाच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृह येथे दर्पनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आ.लक्ष्मण पवार, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब मस्के, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप, वैद्यकीय अधिक्षक डॉ.महादेव चिंचोळे, नायब तहसीलदार जाधवर, मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, सहाराचे संचालक संतोष गर्जे, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, पंचायत समिती सदस्य शाम कुंड, डॉक्टर संघटनेचे तालुकाध्यक्ष सर्वोत्तम शिंदे, आधार हाँस्पिटलचे संचालक डॉ.बी.आर.मोटे, गोदावरी मल्टीस्टेटचे प्रभाकर पराड, पत्रकार दिनकर शिंदे, सोमनाथ मोटे, शेख जावेद, एकनाथ लाड, काँग्रेसचे अँड. गणेश कोल्हे, सुप्रसिद्ध निवेदक महादेव चाटे, बहिर, श्याम गायकवाड, उमेश मिरकड, याहिया खान, चंद्रकांत संत, प्रल्हाद शिंदे, शिवाजी ढोबळे, मुख्याध्यापक माणिक रणबावळे, रविंद्र अरबाड, गणेश कदरे, अशोक गलांडे, गजानन औटे, अनमोल सोळुंके आदींसह विविध राजकीय, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आदींनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. तर रेणुकामाता अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक जाधव यांनी शाखेच्या वतीने गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचा यथोचित सन्मान केला.