January 22, 2025

सुनावणीवेळी न्यायालयाने त्या प्राध्यापक मुलाला खडे बोल सुनावले.

आईचा सांभाळ करीत नसलेल्या प्राध्यापकाला सत्र न्यायालयाची तंबी

सुनावणीवेळी न्यायालयाने त्या प्राध्यापक मुलाला खडे बोल सुनावले.

औरंगाबाद दि २८ ( वार्ताहार ) – म्हातारपणी आईवडिलांचा सांभाळ करीत नसल्याच्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये आईचा सांभाळ करीत नसलेल्या एका प्राध्यापकाला न्यायालयाने मात्र चांगलीच तंबी दिल्याने तो प्राध्यापक चर्चेत आला आहे. ९५ व्या वर्षी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या म्हाताऱ्या आईला त्या प्राध्यापक मुलाला दर महिन्याला सात हजार रुपये देण्याचे आदेशही पैठणच्या तालुका सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. वाघ यांनी दिले आहेत

पैठणमधील ९५ वर्षीय प्रयागाबाई बाबुराव आनंदकर या मरणासन्न अवस्थेत जीवन जगत आहेत. त्यांचा मुलगा प्राध्यापक आहे. त्याला पगार देखील चांगला आहे. मात्र त्यांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. सोबतच आईचा विश्वासघात करून तिच्या नावावरची जमीनही विकली. त्यानंतर आई एकाकी पडली. विशेष म्हणजे तो पाच वर्षाचा असताना वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हापासून तो मुलगा प्राध्यापक होईपर्यंत आईने मजुरी करून शिकवले. तो प्राध्यापक झाला, मात्र आईच्या कष्टाची किंमत त्यांनी केलीच नाही

म्हाताऱ्या आईला मुलगा सांभाळत नसल्यामुळे ऍड. विजयकुमार मुळे, सचिन पाटील यांच्यामार्फत न्यायालयात उदरनिर्वाह करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर पैठण न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयाने त्या प्राध्यापक मुलाला खडे बोल सुनावले. आता आईला दरमहा सात हजार रुपये द्यावेत आणि ही रक्कमही आठ दिवसांच्या आत जमा करावी असे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *