संविधानाने स्वाभिमान शिकवला
संविधानाने स्वाभिमान शिकवला
पोरांनो विचाराने मोठे होऊन समाजाचे आणि देशाचे भले करा – प्रा. सुशिला मोराळे
गेवराई दि. 27 : वार्ताहर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणूस बनवले आहे. त्यांनी खचलेल्या, पिचलेल्या समाजाला स्वाभिमान दिला. त्यामुळे नवे विचार पेरण्यासाठी मुलांनी तयार असले पाहिजे. विचार मांडणे काळाची गरज असून, एक ज्वलंत विचार समाजाला परिवर्तनशील होण्याची प्रेरणा देतात. म्हणून, पोरांनो तुम्हाला या देशाचे भवितव्य व्हायचे आहे. या ग्लोबल जगाशी लढायचे असून, विचाराने मोठे व्हा आणि समाजाचे, देशाचे भले करा, असे आवाहन जेष्ट नेत्या प्रा. सुशिला मोराळे यांनी येथे केले. दरम्यान, प्रा. मोराळे ताईनी गायलेल्या ;
वादळी वाऱ्या मंधी ,पाहिला भीम आम्ही, चवदार तळ्या मंधी आणि
अगर…भीम नही होते. तो हम कहा होते. जुल्मो मे पले है हम. उभरे है तुफानो में, हम आग लगा देंगे, इस बर्फीली चट्टानों मे..! ओ बात करो पैदा, तुम अपनी जूबानो में..! या दोन भीम गिताने धमाल उडविली.
भारतीय संविधान दिनानिमीत्त मॅा.संतोषी अर्बन व संस्कृती प्रतिष्ठाण, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने, येथिल ‘सहारा बालग्राम’ येथे ‘भीमरत्न करंडक’ राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे दि. २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून, बालग्राम च्या विद्यार्थ्यांनी
भिमराया घे…..तुझ्या लेकराची वंदना ! या सुंदर गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
व्यासपीठावर प्रा. सुशिला मोराळे, रिपाई अध्यक्ष किशोर कांडेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, करण जाधव, मां. संतोषी अर्बन बँकेचे चेअरमन संतोष भालशंकर, शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे , माजी नगराध्यक्ष सौंदरमल यांची उपस्थिती होती.
प्रा. सुशिला मोराळे यांनी पप्पू कागदे आंतरराष्ट्रीय नेते झाले म्हणून ते कदाचित या कार्यक्रमाला आले नाहीत, अशी सुरूवात करून बहुजन विचाराशी असलेल्या बांधिलकीतून ,वकृत्व स्पर्धेसारख्या विषयाची गरज व्यक्त केली. त्या म्हणाल्या की,
विचार मांडणे काळची गरज आहे. कारण, विचार समाजातील विविध घटकामध्ये नवचैतन्य निर्माण करतात. विचाराला मरण नसते, ते सदासर्वकाळ समाजाला परिवर्तनशील होण्यासाठी प्रेरणा देत असतात. म्हणून, न भिता व्यक्त होता आले पाहिजे. तो अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याचा काळ कठीण असून, युवा पिढीने सजग नागरिक म्हणून कार्यरत राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगून, संविधानाची किमान एक प्रत आपल्या घरात असायला हवी. जे घरात असायला हवे. ते घरात नसणे ही आपली खरी शोकांतिका असल्याचे प्रा. मोराळे यांनी शेवटी बोलताना सांगितले. यावेळी रिपाई नेते किशोर कांडेकर, माधव चाटे, मंगेश लोळगे,बालग्रामचे संतोष गर्जे यांची भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
संजय भालशंकर, माधव चाटे व राहुल गिरी यांच्यासह स्पर्धेच्या संयोजन समीतीचे सदस्य विनोद सौंदरमल, भागवत जाधव, शैलेश जाजू, आण्णासाहेब राठोड, पत्रकार सुभाष सुतार, उद्धव मडके, किशोर सोनवणे, सुनील मुंडे, संतोष सुतार, पंकज पाटेकर, प्रा.आर.आर.उगले, प्रा.नरेश घुंगरड यांसह आदींनी केले आहे. सुत्रसंचालन राहुल गिरी यांनी करून, आभार पत्रकार भागवत जाधव यांनी व्यक्त केले.