April 19, 2025

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदासाठी युध्दाजित पंडित यांचे नाव आघाडीवर

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदासाठी युध्दाजित पंडित यांचे नाव आघाडीवर

बीड दि २४ ( वार्ताहार ) बीड जिल्ह्यात अल्पशा कार्यकाळात कुडंलिक खांडे याचं नाव वादग्रस्त राहिले आहे गुटख्याच्या वादात अडकलेल्या कुंडलिक खांडे यांच्या जिल्हा प्रमुख पदाला स्थगिती देण्यात आली असली तरी शिवसेनेचा नव्या दमाचा जिल्हाप्रमुख यांची गरज शिवसेनेला आहे त्यातच गेवराईचे माजीमंत्री बदामराव पंडित यांचे सुपूत्र माजी अर्थ व बांधकाम सभापती युद्धाजित पंडित यांच नाव जिल्हा प्रमुख पदासाठी आघाडीवर असल्याची खात्रीलायक माहिती आहे .

बीड जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री बदामराव पंडित यांचे वजन आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात याच सगळ्या दोन दिवसांच्या घडामोडीत बीड जिल्ह्याच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे त्यातच जुने कार्यकर्ते देखील आपआपल्या परिने तयारीला लागले आहेत परंतू येत्या दोन दिवसांत नविन बीड जिल्ह्याचा शिवसेनेचा नुतन जिल्हाप्रमुख निवडण्याच्या हालचालीनां वेग आला आहे यातच गेवराई तालुक्याला जिल्हा प्रमुख पद मिळाले तर तालुक्यासह जिल्ह्याला चांगला नेता मिळू शकतो परंतू ऐकांदरीत परिस्थिती पहाता आजच्या टायमिंगला जिल्हा प्रमुख पदासाठी युध्दाजित पंडित यांचे नाव आघाडीवर असुन ते दव्या दमाचे जिल्हाप्रमुख म्हणून पदभार घेऊ शकतात अश्या घडामोडी वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *