April 19, 2025

माजी पं..स. सदस्य घनश्याम आबूज, विलासराव सरक राष्ट्रवादीत दाखल

 

माजी पं..स. सदस्य घनश्याम आबूज, विलासराव सरक राष्ट्रवादीत दाखल

अमरसिंह पंडित यांनी केले स्वागत

गेवराई दि.२७(प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार ईनकमिंग सुरु झाली असून सिंदफणा चिंचोली येथील माजी पं. स. सदस्य घनशाम आबुज, रामपुरी येथील भाजपचे माजी पं. स. सदस्य विलासराव सरक आणि मालेगाव येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते शंकर घवाडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

सिंदफणा चिंचोली येथील माजी पं. स. सदस्य घनशाम आबुज यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब आणि जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला तसेच मालेगाव येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते शंकर घवाडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, उप सभापती शामराव मुळे, माजी सभापती पाटीलबा मस्के, सरपंच माऊली आबुज, वसंतराव उबाळे, सरपंच मोहन कुटे, सुनील राऊत, परमेश्वर धायगुडे, रामेश्वर वाघमोडे, मिनाज शेख, रवी शिर्के, नारायण डरफे, अनंता राऊत, दत्ता घवाडे, सुभाष जगदाळे, कर्ण गाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रामपुरी येथील भाजपचे माजी पं. स. सदस्य विलासराव सरक आणि कैलासराव सरक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते बालाभाऊ लोया, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुभाषराव मस्के, माजी सरपंच अनिरुद्र तौर, भगवान घरबुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *