April 19, 2025

प्रगतिशील लेखक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश भुते तर धर्मराज करपे..

गेवराई, दि.२१- ( प्रतिनिधी ) गेवराई तालुका प्रगतिशील लेखक संघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. अॅड. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी साहित्यीक प्रकाश भुते यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या बैठकीसाठी प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सहसचिव डॉ. समाधान इंगळे, जिल्हाध्यक्ष राजकुमार कदम, उपाध्यक्ष प्रा. शरद सदाफुले, रमेश गायकवाड, कोषाध्यक्ष अभिमान खरसाडे, कवी पजांब येडे, डी. जी. तांदळे यांची उपस्थिती होती.
तालुका कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश भुते,उपाध्यक्ष विष्णुप्रसाद खेत्रे, रंजना सोनवणे , सय्यद मुज्तबा , सचिवपदी धर्मराज करपे यांची तर सहसचिव म्हणून अशोक निकाळजे आणि पल्लवी माळी यांची निवड झाली. कोषाध्यक्ष पदी संतोष प्रधान, सहकोषाध्यक्ष वसंत केदार ,तालुका संघटक म्हणून परमेश्वर शिंदे हे काम पाहणार आहे.
सुकाणू समितीचे प्रमुख म्हणून अॅड. सुभाष निकम तर सदस्य म्हणून प्रा. राजेंद्र बरकसे, डॉ. बापू घोक्षे, शाहीर विलास सोनवणे, डॉ. सदाशिव सरकटे, डॉ. न. पु. काळे, प्रशांत रूईकर, सुभाष सुतार, तात्यासाहेब मेघारे, संतोष गर्जे, धनंजय सुलाखे, माधव चाटे, प्रा. शरद सदाफुले, विष्णू खेत्रे ,डॉ कृष्णा वैद्य यांची निवड करण्यात आली .
याप्रसंगी तालुका कार्यकारिणीचे सदस्यपदी जगन्नाथ जाधव, सुरेखा येवले, रगीब इनामदार, सुरेश तळेकर, संतोष कोठेकर, सविता ढाकणे, शिल्पा वाघमारे, रुद्राक्ष कदम, संतोष गायकवाड, शोभा दळवी, प्रा. शत्रुघ्न जोगदंड, पूजा काळे, जितेंद्र सुतार, प्रा. गणेश टकले आदींची निवड करण्यात आली.
या तालुका कार्यकारिणीकडून गेवराई शहर आणि तालुक्यात विविध साहित्यिक उपक्रम राबवले जाणार आहेत. या निवडीबद्दल शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रगतिशील लेखक संघाने नियुक्तीपत्रे दिले आहे.
प्रगतिशील लेखक संघ हे देशातील लेखकांचे पहिले संघटन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश दडपशाहीविरुद्ध उभे राहिलेले हे लेखक संघटन स्वातंत्र्योत्तर काळातही देशाच्या सर्व राज्यांमधून कार्यरत आहे. देशातील सर्व भाषांमधून प्रागतिक विचार करणाऱ्या साहित्याला पाठबळ देणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून देशभर विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये सर्व भाषांचा समावेश असतो.
त्यामुळे गेवराई शहरात बहुभाषिक कार्यक्रम घेण्यासाठी एक चांगले विचारपीठ उपलब्ध झाल्याचे समाधान निवड समितीने व साहित्यप्रेमी नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *