April 19, 2025

दफ्तर दिरंगाई प्रकरणात आयुक्तांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

बीड जिल्ह्य़ातील नरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात कारवाईस दफ्तर दिरंगाई प्रकरणात विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकारी यांना आदेश 

बीड जिल्ह्य़ातील नरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात कारवाईस दफ्तर दिरंगाई प्रकरणात विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकारी यांना आदेश ,रोहयो मंत्री संदिपान भुमरेंच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

बीड दि २४ /वार्ताहर 

बीड जिल्ह्य़ातील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करणारे उपजिल्हाधिकारी रोहयो जि.का.बीड, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड व चौकशी अहवालास दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी दि. ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व कारवाई न झाल्यास रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला होता. त्या निवेदनाच्या अनुषंगानेच विभागीय आयुक्त (रोजगार हमी योजना शाखा)कार्यालय औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी बीड यांना पत्रक क्रमांक जा.क्र २०२१/रोहयो/जन-१/कावि-४७३ दि.१ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पत्रकानुसार तक्रारीमध्ये नमुद मुद्यांच्या अनुषंगाने अर्जदार व अर्जातील मुद्यांबाबत संबधित आधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून प्रकरणात तोडगा काढुन अर्जदार यांना आंदोलनापासुन परावृत्त करावे आणि केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल तात्काळ कार्यालयास पाठविण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. 

विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल कारवाईची मागणी करत रोहयो मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
____
बीड जिल्ह्य़ातील मनरेगा अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी दि.३ ऑगस्ट तसेच २८ सप्टेंबर तसेच दि.७ ऑक्टोबर रोजी आदेश देऊन सुद्धा कारवाई न केल्याबद्दल संबधितांवर विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठीच रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा दिला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *