April 19, 2025

काम नाही करत म्हणून मालकांची वेटरला मारहान ;पुरावा नष्ट करण्यासाठी मृत्यूदेह फेकला नदीतय

बीड (पाटोदा)दि २५ ( वार्ताहार) : महिनाभरापूर्वीच हॉटेलमध्ये कामाला लागलेला वेटर काम करत नाही आणि सतत दारू पीत असतो, याचा राग येऊन हॉटेल मालकाने त्याला बेदम मारहाण केली. यात वेटरचा मृत्यू (Murder case in Beed) झाला. हा प्रकार लपवण्यासाठी हॉटेल मालकाने वेटरचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. वेटरच्या मुलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला.

वेटरच्या खिशातील फोन नंबरवरून तपास

या प्रकरणी वेटर बबन भाऊसाहेब कुलट यांचा मुलगा रोहित कुलट याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वडील बबन कुलट यांना दारू पिण्याची सवय होती. ते नगर जिल्ह्यातील खडकवाडी येथील रहिवासी होते. पण काम मिळेल त्या ठिकाणी हे कुटुंब रहायला जात होते. महिनाभरापूर्वी ते पाचंग्री येथील हॉटेल मालक अंगद मुंडे यांच्याकडे कामाला लागले. मात्र सतत दारू पीणे आणि काम न करणे, यावरून हॉटेल मालकाने त्यांना सोमवारी प्रचंड मारहाण केली. अंगद मुंडे यांनी त्यांना काठीने मारल्याने बबन यांचा मृत्यू झाला. या खूनाचा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून हॉटेल मालकाने त्यांचा मृतदेह भायाळा ते कचरवाडीदरम्यान दरीत फेकून दिला.

मुलाने तक्रार दिल्यावर प्रकार उघड

सोमवारी बबनचा मृतदेह परिसरातील काही गुराख्यांना आढळून आला. त्यांनी पाटोदा पोलिसांना याविषयी माहिती दिली. दरम्यान बबन यांच्या मुलाने हॉटेल मालकाला चौकशी केली असता, तो रविवारीच हॉटेलमधून निघून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र ही माहिती बबन यांच्या पत्नीने पोलिसांना फोन करून सांगितली.
बबन यांच्या मृतदेहावरील जखमांवरून त्यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या खिशात सापडलेल्या फोन नंबरवर फोन केल्यानंतर पोलिसांना या खूनाची दिशा मिळत गेली. या प्रकरणी हॉटेल मालकाला ताब्यात घेतले असून यात अजूनही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *