January 22, 2025

अपघात १७ जणांचा मृत्यू

मुंबई :दि २८ ( वार्ताहार ) नियती आपल्यासमोर काय आणून ठेवेल याचा काही नेम नाही. घटना अशा घडतात की, तुमच मन सुन्न होतं. अंत्यविधीकरता घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाला असून 23 लोक जखमी झाले आहेत. 

ही घटना मन स्तब्ध करणारी आहे. पश्चिम बंगाल च्या नदिया मध्ये हा धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने काळ किती क्रूर आहे हे अधिक स्पष्ट होतं. या अपघातात 40 जण एका वाहनात होते. ते अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जात होते. काल रात्री 2 च्या सुमारास एका भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली, यात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित जखमींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 17 जणांमध्ये 10 पुरुष, 7 महिला आणि एका 6 वर्षीय निष्पापाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *