
लसिकरण जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी गावांत ; तालुक्यातील नंदपुर कांबी याठिकाणी भेट
लसिकरण जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी गावांत |
तालुक्यातील नंदपुर कांबी याठिकाणी भेट
गेवराई दि २८ ( वार्ताहार ) बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कोविड लसिकरणाबाबद जनजागृती करत असुन गेवराई तालुक्ययातील नंदपुर कांबी याठिकाणी सुरू असलेल्या लसिकरण केंद्राला जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी भेट दिली व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी लसिकरणाबाद थेट संवाद साधला आहे .
या बाबद अधिक माहिती अशी की , सध्या लसिकरणावर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे गावोगावात जाऊन लसिकरण नागरिकांनी करूण घ्यावेत यासाठी आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी कॅम्प लावण्यात येत असुन आज स्वत: बीडच्या जिल्हाधिकारी यांनी गावांत जाऊन याबाबद सर्वसामान्य नागरिकांत जनजागृती केली तसेच जास्थित जास्त लसिकरण करण्याबादच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या आहेत यावेळी जिल्हाधिकारी समवेत उपविभागिय अधिकारी नामदेव टिळेकर , तहसिलदार सचिन खाडे , तालुका वैधकिय अधिकारी डॉ संजय कदमसह अनेक प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .